Gadchiroli News : जहाल माओवादी तारक्काचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आज माओवादी आठ पुरूष आणि तीन महिलाांनी आत्मसमर्पण केले. जहाल महिला माओवादी नेता तारक्कानेदेखील आज मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केले.
कोण आहे तारक्का?
तारक्का ही माओवाद्याच्या संघटनेचं देशभरातलं दुसऱ्या क्रमांकाचं नेतृत्व असलेल्या केंद्रीय समिती सदस्य भूपतीची पत्नी आहे. पश्चिम बंगालमध्ये चकमकीत ठार झालेला जहाल माओवादी नेता किशनजीची वहिनी आहे. तारक्का 1983 मध्ये माओवाद्यांच्या संघटनेत दाखल होणारी गडचिरोलीतली पहिली महिला माओवादी आहे. तारक्का सध्या माओवाद्याच्या दडकरण्या झोनल समितीची सदस्य आहे. तारक्काचे मूळ नाव विमला सीडाम आहे. तिच्यावर 170 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर चार राज्यात मिळून एक कोटी पेक्षा जास्तीच बक्षीस आहे.
माओवाद्यांची भरती बंद
माओवाद्यांचा प्रभाव संपवून आम्ही गडचिरोली हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा बनविण्यास सुरुवात केली आहे. गडचिरोलीमध्ये एकेकाळी माओवाद्यांचे पूर्ण वर्चस्व होते. आज ते वर्चस्व आम्ही संपवत आहोत. येथे दोन मोठ्या चौक्या बांधल्या आहेत. आता इथे माओवाद्यांना नवीन लोक भेटत नाहीत. माओवाद्याची भरती बंद असून ते मोठ्या प्रमाणात शरणागती पत्करत आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.





