Navneet Rana in Mahakumbh । भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी नुकतेच महाकुंभ मेळ्यात जाऊन पवित्र स्नान केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधताना एक विधान केले ज्यावरून आता चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. नवनीत राणा यांच्या विधानांवर आहवान आखाड्याचे पीठाधीश आणि आचार्य महामंडलेश्वर स्वामी अरुण गिरी जी महाराज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वामी अरुण गिरी जी यांच्या मते,”नवनीत राणा यांनी महाकुंभात येऊन खोटे विधान केले आहे.” त्यांनी द्वेषाचे विधान केले Navneet Rana in Mahakumbh । स्वामी अरुण गिरी जी म्हणाले की, नवनीत राणा यांनी धर्माच्या नावाखाली राजकीय भाकरी मिळवल्या आहेत. येथून एक सकारात्मक संदेश जायला हवा होता, पण त्यांनी द्वेषाचे विधान केले आहे. या प्रकारची विधानं आम्हाला पूर्णपणे अमान्य आहे. याशिवाय, स्वामी अरुण गिरी जी महाराजांनी ममता कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर पद सोडण्यावर आणि नंतर राजीनामा मागे घेण्यावरही भाष्य केले. त्यांनी म्हटले आहे की,” ममता कुलकर्णी आणि किन्नर आखाडा यांनी परंपरा मोडल्या आहेत. हे घडायला नको होते. धर्म हा विनोद बनवला गेला आहे”. त्यांच्या मते, “ममता कुलकर्णी प्रकरणामुळे अनावश्यक वाद निर्माण झाला आहे.” काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा ? Navneet Rana in Mahakumbh । दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या विधानाद्वारे ओवेसी बंधूंवर निशाणा साधला. त्या म्हणाले की, जे लोक १५ मिनिटे मागण्याच्या गोष्टी करतात त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की जर सनातनींना १५ सेकंदांची मोकळीक मिळाली तर काय होऊ शकते. याचा त्यांनी विचार करावा असे म्हटले होते. त्यांच्या याच विधानावर सध्या वाद निर्माण झाला आहे. हेही वाचा ‘सीआरपीएफ जवानाकडून कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार ; स्वतःवर गोळी झाडत केली आत्महत्या; गोळीबारात २ जवान जागीच ठार