#RussiaUkraineWar : पुतिन यांचा आरोप, म्हणाले “युद्धासाठी ‘नाटो’ युक्रेनला अप्रत्यक्षपणे शस्त्रे..”

मॉस्को – युक्रेनविरोधातील युद्धात “नाटो’ अप्रत्यक्षपणे सहभागी होत आहे. युद्धासाठी “नाटो’ युक्रेनला अप्रत्यक्षपणे शस्त्रे पुरवत आहे. रशियाविरोधात अण्वस्त्रे वापरण्याची तयारी पाश्चात्य देशांकडून केली जात असल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी केला आहे.
पाश्चात्य देश युक्रेनला शस्त्र खरेदीसाठी अब्जावधी डॉलर पुरवत आहेत. हा खरोखर युद्धातील सहभाग आहे. मात्र हा सहभाग अप्रत्यक्ष आहे. युक्रेनच्या राजवटीकडून करण्यात येत असलेला हा गुन्हा आहे, असे पुतिन म्हणाले. रशियातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हा आरोप केला. युक्रेनविरोधात रशियाने सुरू केलेल्या लष्करी कारवाईला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी ही मुलाखत दिली आणि रशियाची भूमिका स्पष्ट केली.
पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचे आणि या रशियाचा मुख्य गाभा असलेल्या रशियन फेडरेशनचे तुकडे करणे एवढेच पाश्चात्य देशांचे उद्दिष्ट आहे. असे तुकडे केल्यानंतरच तथाकथित सभ्य लोकांच्या कुटुंबामध्ये रशियाला गणले जाईल. मात्र प्रत्येक तुकडा वेगळा वेगळा गणला जाईल, असे पुतिन म्हणाले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ajit-pawar-questioned-the-election-commission-said-if-a-mns-mla-sues-the-party/
बहुध्रुवीय जग साकारले जात आहे. निशंकपणे बहुध्रुवीय जग अस्तित्वात येत आहे. केवळ अमेरिकेच्या हितासाठी नवीन जग अस्तित्वात येऊ पाहात आहे, असेही पुतिन म्हणाले.





