NCP Crisis | राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाचं कामकाज आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे याप्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली होती. परंतु आज सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाने मागील सुनावणीवेळी अजित पवार गट प्रचारात शरद पवार यांचा फोटो वापरत असल्याचा दावा केला होता. त्यावर कोर्टाने कडक ताशेरे ओढत अजित पवार यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशी जाहिरात वृत्तपत्रात देण्याचे आदेश दिले होते. NCP Crisis | राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने दिला होता. शरद पवार गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी याचिका दाखल करत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय एकतर्फी असल्याचा दावा केला होता. यावर आता आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. NCP Crisis | शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ असं नाव दिलं होतं तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. सर्वोच्च न्यायालयाचे यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आणि यावरच पुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. त्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवत शरद पवारांचे आठ खासदारविजयी झाले तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकच खासदार निवडून आला. NCP Crisis | हेही वाचा: “पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून माने यांनी विजयाचा दिवा लावला” ; हर्षवर्धन पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य