National Sports Day: खेळाचे नाते निरोगी आयुष्याशी…!
National Sports Day: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी देश साजरा करतोय राष्ट्रीय क्रीडा दिन; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशभरातील खेळाडूंचे अभिनंदन.

National Sports Day: खेळाचे नाते निरोगी आयुष्याशी आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी आणि मानसिक बळकटीसाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त (29 ऑगस्ट) देश राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो. त्यांच्या कौशल्याने आणि जिद्दीने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले होते, त्यांची हीच कामगिरी गेली अनेक वर्षे नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ध्यानचंद यांनी दाखवलेली जिद्दच आजच्या काळातही महत्वाची आहे. समाजात नोहमी क्रीडा आणि खेळाडूवृत्ती तेजीत राहो. हार-जीत पेक्षा खेळातला आपलेपणा आणि जिद्द महत्त्वाची असते. याच खेळाला तसेच देशाच्या अकूणच क्रीडा क्षेत्राला बळकटी मिळावी म्हणून केंद्र सरकार व केंद्रिय क्रीडामंत्रालयानेही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. देशात खेळाची संस्कृती रुजवण्यासाठी खेलो इंडिया अभियान आणि टॉप्स योजनेसारख्या उपक्रमांद्वारे खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि संधी मिळवून देण्यावर त्यांचे विशेष बल असते.
खेळामुळे शिस्त निर्माण होते आणि तरुण देशाच्या विकासात (विकसित भारत) मोठे योगदान देऊ शकतात. आपल्या समाजात क्रीडा आणि खिलाडूवृत्ती नेहमीच उजळून निघेल अशी आशा व्यक्त करतो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मी देशभरातील सर्व क्रीडाप्रेमींचे अभिनंदन करतो आणि आशा व्यक्त करतो की, आपल्या समाजात क्रीडा आणि खिलाडूवृत्ती नेहमीच उजळून निघेल. फीट इंडिया या कल्पनेचे चळवळीत रुपांतर करण्यासाठी मी क्रीडा मंत्रालयाचे अभिनंदन करतो.
सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देतानाच मिशन फिट इंडियाचीही मी घोषणा करत आहे. मिशन फिट इंडियाला एका जनआंदोलनाचे रुप द्यायचे आहे. प्रत्येकी वेळी कठोर परिश्रम करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव मोठे करणार्याआ प्रत्येक खेळाडूचे आभार मानन्याचा हा दिवस आहे. गेल्या पाच वर्षांत देशभरात क्रीडाला प्रोत्साहन मिळाले आणि त्याचा निकाल आपण पाहतो आहे. क्रीडा म्हणजेच तंदुरुस्ती. फिटनेस हा केवळ एक शब्द नसून स्वस्थ आणि समृद्ध जीवन जगण़्याचा मंत्र आहे.
देशातील खेळाडूंना पाठबळ देणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि भारताला उत्कृष्ट क्रीडांचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकार यासाठी वचनबद्ध आहे. क्रीडा दिनाचे औचित्य साधत देशात तीन दिवसांचा क्रीडा महोत्सव साजरा केला जात आहे. खेळांना प्रोत्साहन देणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण व्हावी, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात क्रिडा क्षेत्रात प्रगती झाली आहे. पुढील वर्षांतही क्रिडा क्षेत्रात अशी प्रगती होत राहो आणि क्रिडा क्षेत्रात देशाचे नाव मोठे व्हावे.
राष्ट्रीय क्रिडा दिवसाच्या निमित्ताने गल्ली बोळींमध्ये खेळाचे महत्व पोहोचवण्यासाठी युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयाद्वारे देशातील विविध शाळांमध्ये क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे लहान वयातच विद्यार्थांमध्ये खेळांमध्ये रुची वाढेल व यातूनच भविष्यातील विक्रमवीर खेळाडू तयार होतील. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 39 पदकांची कमाई केली. त्यात दहा खेळ नव्हते तरीही एवढ्या मोठ्या संख्येने आपण पदके मिळवली.
आता लक्ष्य 2030 सालची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, तसेच त्यानंतर भारताची दावेदारी असलेली 2036 सालची ऑलिम्पिक स्पर्धाही डोळ्यासमोर ठेवत केंद्रीय क्रीडामंत्रालय आतापासूनच तयारीला लागले आहे. या स्पर्धांमध्ये भारताने जागजित स्तरावर चीन, अमेरिका तसेच अन्य परदेशी संघांची मक्तदारी संपुष्टात आणावी हीच माझ्यासह सर्व देशवासियांची अपेक्षा आहे.
तसेचत्यानंतर 2028 साली देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यावेळी भारतीय खेळाडू पदकांची शंभरीही साकार करतील असा मला विश्वास आहे. आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनी मी हेच म्हणेन की संपूर्ण देश फिट इंडिया मोहिमेत सहभागी व्हावा, खेळाडूंनाही भरघोस पाठींबा द्यावा व आपल्या अपेक्षाही पूर्ण व्हाव्यात.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी






