National Sports Awards : राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण! दिव्या-तेजस्विनसह १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार; पॅरा-क्रीडा क्षेत्रातील दोन खेळाडूंचाही गौरव
National Sports Awards 2025 Winner List : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील १७ गुणवंत खेळाडूंना प्रतिष्ठेच्या 'अर्जुन पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.

National Sports Awards 2025 President Droupadi Murmu Arjuna Award : शुक्रवारी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या दिमाखदार समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील १७ गुणवंत खेळाडूंना प्रतिष्ठेच्या ‘अर्जुन पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राच्या युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि विदित गुजराथी यांच्यासह डेकाथलीट तेजस्विन शंकर, बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली यांचा समावेश आहे.
मात्र, यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कारासाठी एकाही खेळाडूची निवड न झाल्याने क्रीडा वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. २०१४ नंतर दुसऱ्यांदा असा प्रसंग घडला असून, प्रत्येक अर्जुन पुरस्कार विजेत्याला प्रत्येकी १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
बुद्धिबळपटू दिव्या, विदितसह पॅरा-खेळाडूंचा गौरव –
२० वर्षीय दिव्या देशमुखने बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा इतिहास रचला आहे, तर विदित गुजराथी २०२४ मधील बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुवर्णपदक विजेत्या संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता तेजस्विन शंकर, बॉक्सर नरेंद्र बेरवाल, कर्णबधिर नेमबाज धनुष श्रीकांत आणि पॅरा-क्रीडा क्षेत्रातून सुवर्णपदक विजेते एकता भ्यान व नेमबाज रुद्रांश खंडेलवाल यांनाही अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले.
जीवनगौरव आणि प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान –
PM Modi Inaugurates Bengaluru Metro’s Pink Line.
President Droupadi Murmu presents National Sports Awards 2025 at Rashtrapati Bhavan.
SAD president Sukhbir Badal is likely to meet Union Home Minister Amit Shah today. https://t.co/Eg7My79mts
— DD NEWS SRINAGAR (@ddnewsSrinagar) November 13, 2026
१९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाचे सदस्य आय. अरुमैनायगम यांना जीवनगौरव श्रेणीतील अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तर प्रशिक्षक श्रेणीत परवीर सिंग, छोटे लाल यादव आणि नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तसेच धर्मेंद्र यादव आणि कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र कुमार यांना जीवनगौरव द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गतवर्षी चार दिग्गजांना मिळाला होता ‘खेलरत्न’ सन्मान –
Celebrating excellence on the field! 🏅🇮🇳
𝐀𝐫𝐣𝐮𝐧𝐚 𝐀𝐰𝐚𝐫𝐝𝐬 𝟐𝟎𝟐𝟓 🏆📙
Shri Tejaswin Shankar (Athletics)
Shri Muhammed Ajmal V (Athletics)
Ms. Priyanka Goswami (Athletics)
Ms. Treesa Jolly (Badminton)#ArjunaAwards #NationalSportsAwards https://t.co/6h6J36ZmJ1
— Dept of Sports, Govt of India (@IndiaSports) November 13, 2026
गेल्या वर्षी डी. गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार आणि मनू भाकर यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते; यंदा मात्र या सर्वोच्च सन्मानाची पाटी कोरीच राहिली आहे.
संपूर्ण अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडूंची यादी:
Celebrating excellence in Indian sports! President Droupadi Murmu honours the country’s sporting talent at the National Sports Awards 2025 ceremony in New Delhi.
The awards recognise athletes and coaches across disciplines, with Tejaswin Shankar, Divya Deshmukh, Vidit Gujrathi, Treesa Jolly and Gayatri Gopichand among the recipients.
Follow the complete story on #PBSHABD. Register now at https://t.co/0uMyeVb8Eq
@rashtrapatibhvn
#NationalSportsAwards2025 #PresidentDroupadiMurmu #IndianSports
— PB-SHABD (@PBSHABD) November 13, 2026
तेजस्विन शंकर, प्रियांका गोस्वामी, मोहम्मद अजमल (ॲथलेटिक्स), विदित गुजराथी, दिव्या देशमुख (बुद्धिबळ), गायत्री गोपीचंद, त्रिसा जॉली (बॅडमिंटन), राजकुमार पाल, लालरेमसियामी (हॉकी), सुरजीत, पूजा, निधी शर्मा (कबड्डी), नरेंद्र (बॉक्सिंग), धनुष श्रीकांत (बधिर नेमबाजी), अखिल शेओरन (नेमबाजी), अरविंद सिंग (रोइंग) आणि एकता भ्यान / रुद्रांश खंडेलवाल (पॅरा-क्रीडा).





