Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार ओवाळणी; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं…
Ladki Bahin Yojana – मध्य प्रदेशातील रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना आणखी ओवाळणी मिळणर आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोमवारी जाहीर केले की यावेळी लाडक्या बहिणींना २७ व्या १२५० रुपयांच्या नेहमीच्या हप्त्यासह अतिरिक्त २५० रुपयांचा बोनस दिला जाणार आहे.
ही योजना मध्य प्रदेशातील महिलांच्या सबलीकरणाच्या दिशेने यशस्वी ठरली आहे. मुख्यमंत्री यादव म्हणाले की, ही रक्कम राज्याच्या प्रमुख योजनेंतर्गत दरमहा १२५० च्या रकमेच्या व्यतिरिक्त आहे. प्रत्येक स्त्री माझी बहीण आहे. हा अभिमान आणि आदर आहे.
माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १० जून २०२३ रोजी जबलपूर येथून लाडकी बहिण योजना सुरू केली. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शानदार विजयाचे हे एक प्रमुख कारण मानले जाते. महिलांसाठीच्या २७१४७ कोटी रुपयांच्या विशेष अर्थसंकल्पापैकी १८६९९ कोटी रुपये लाडकी बहिण योजनेसाठी आहेत.





