नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : ईडीच्या आरोपपत्राविरुद्ध काँग्रेस उतरली रस्त्यावर ; भाजप म्हणाले,”सोनिया, राहुल जामिनावर…”

National Herald case । नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात तपास यंत्रणा ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहेत. या ईडीच्या कारवाईने काँग्रेसने संताप व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. कारण ईडीच्या आरोपपत्रात माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेचे नेते राहुल गांधी, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा, सुमन दुबे यांच्यासह अनेकांची नावे आहेत.
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालय २५ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. ११ एप्रिल रोजी, ईडीने दिल्ली, मुंबई आणि लखनौच्या मालमत्ता रजिस्ट्रारना नोटिसा बजावल्या होत्या, जिथे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ची मालमत्ता आहे.
सूडाचे राजकारण – काँग्रेस National Herald case ।
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीने दाखल केलेले आरोपपत्र पूर्णपणे सूडाचे राजकारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा विरोधी नेत्यांना धमकावण्यासाठी सरकारी एजन्सींचा वापर करत आहेत,” असा आरोप काँग्रेस केला आहे, परंतु भाजपनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज एक पत्रकार परिषदेत, “सोनिया आणि राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत, सोनिया आणि राहुल यांनी खटला संपवण्यासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी उत्तर द्यावे की कायद्याला त्याचे काम करू द्यावे की नाही? नरेंद्र मोदींचे सरकार, कायद्याला त्याचे काम करू देईल.”असे म्हटले आहे.
प्रसाद पुढे म्हणाले की, “सरदार पटेल म्हणाले होते की नॅशनल हेरॉल्डला पैसे देणारे लोक चांगले लोक नाहीत, मग काँग्रेस पक्षाचे प्रमोशन आणि संरक्षण असलेले वृत्तपत्र का टिकू शकले नाही? कारण हे वृत्तपत्र केवळ जाहिराती गोळा करण्याचे आणि सरकारी पाठिंब्याने संपत्ती निर्माण करण्याचे साधन होते.” असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांचा आवाज बळकट करण्यासाठी अपेक्षित असलेले वृत्तपत्र एका खाजगी व्यवसायात, एटीएममध्ये बदलले गेले.असेही त्यांनी म्हटले.
ईडीने आरोपपत्रात काय म्हटले आहे? National Herald case ।
ईडीने त्यांच्या आरोपपत्रात असा आरोप केला आहे की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांच्या २००० कोटी रुपयांच्या मालमत्ता हडप करण्यासाठी गुन्हेगारी कट रचला होता. ईडीने म्हटले आहे की, एका कटाचा भाग म्हणून त्यांनी कंपनीचे ९९% शेअर्स फक्त ५० लाख रुपयांना विकले. एजेएलच्या या मालमत्ता यंग इंडियन या खाजगी फर्मने खरेदी केल्या आहेत आणि या फर्मचे मालक सोनिया आणि राहुल गांधी आहेत. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१४ मध्ये या प्रकरणात तक्रार दाखल केली होती आणि गांधी कुटुंब आणि इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला होता.


