National Games 2023 : तलवारबाजीत महाराष्ट्राला रुपेरी यश
Updated On:

पणजी :- गोव्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तलवारबाजी क्रीडा प्रकारात शनिवारी महाराष्ट्राच्या सॅब्रे संघाने रुपेरी यश संपादन केले. अंतिम सामन्यांत महाराष्ट्र संघाला सेनादल संघाकडून ३४-४५ असे पराभूत व्हावे लागले, त्यामुळे रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं.
महाराष्ट्राच्या संघात आदित्य अनगळ, अभय शिंदे, धनंजय जाधव व निखिल वाघ यांचा समावेश होता. कोल्हापूरचा खेळाडू आदित्य अनगळला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारबाजीमधील रौप्य पदकाची ही भेट मिळाली.
शुक्रवारी अभय शिंदेने पदकांची सॅब्रे वैयक्तिक विभागात कांस्य पदक जिंकले, तर ईपी प्रकारातील वैयक्तिक विभागात गिरीश जकातेने कांस्य पदक पटकावले होते.





