\n

वीरधवल, पलकचा दुहेरी धमाका

\n

महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे आणि पलक जोशी यांनी प्रत्येकी दुसरे सुवर्णपदक जिंकून जलतरणामध्ये दुहेरी धमाका साजरा केला. या दोन सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने दोन रजत व एक ब्रॉंझ अशी एकूण पाच पदकांची कमाई केली.

\n

ऑलिम्पिकपटू वीरधवलने 50 मीटर्स बटरफ्लाय शर्यत 24.60 सेकंद अशा विक्रमी वेळेत जिंकली आणि 2015 मध्ये त्यानेच नोंदवलेला 24.73 सेकंद हा विक्रम मोडला. त्याने 50 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत जिंकून वेगवान जलतरणपटूचा मान मिळाला होता. याच शर्यतीत कांस्यपदक जिंकणारा मिहीर आंम्ब्रेने वीरधवलच्या पाठोपाठ 50 मीटर्स बटरफ्लाय शर्यत 24.67 सेकंदांत पार करीत रजतपदक जिंकले. पुरुषांच्या 100 मीटर्स बॅकस्टोक शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋषभ दासने 57.37 सेकंद वेळ नोंदवत रजतपदक जिंकले. या शर्यतीत ऑलिम्पिकपटू श्रीहरी नटराजन (55.59 सेकंद) हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

\n

महिलांच्या 100 मीटर्स शर्यतीत महाराष्ट्राच्या पलक जोशीने सोनेरी कामगिरी केली. तिने हे अंतर एक मिनिट, 05.29 सेकंदात पार केले. याआधी तिने या स्पर्धेत 200 मीटर्स बॅकस्टोक शर्यतीचेही विजेतेपद मिळवले होते. 50 मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत मात्र ऋजुता खाडेला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. तिने हे अंतर 28.38 सेकंदांत पार केले. याआधी तिने या स्पर्धेत 50 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत जिंकली होती.

\n

महाराष्ट्र महिला संघाला रोलबॉलमध्ये सुवर्ण

\n

श्‍वेता कदमच्या कुशल नेतृत्वासह महेक राऊत, अक्षता आणि स्नेहल पाटीलने उत्तम कामगिरी करत महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रोल बॉलमधील सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला. पुरुष संघाला रजतपदक मिळाले. महाराष्ट्र महिला संघाने अंतिम फेरीमध्ये राजस्थानचा 5-2 असा पराभव केला. महाराष्ट्र पुरुष संघाला रजतपदकावर समाधान मानावे लागले. राजस्थान संघाने महाराष्ट्रावर 7-5 अशी मात केली.

\n

800 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत यमुनाला रजत

\n

महाराष्ट्राच्या यमुना लडकतने महिलांच्या 800 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रजतपदक पटकावले. तिने हे अंतर 2 मिनिटे, 3.24 सेकंदात पार केले. दिल्लीची खेळाडू के. एम. चंदाने सुवर्णपदक जिंकले. तिला हे अंतर पार करण्यासाठी 2 मिनिटे, 1.74 सेकंद वेळ लागला. ऍथलेटिक्‍समधीलच 200 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या जय शहाचे ब्रॉंझपदक थोडक्‍यात हुकले. त्याला हे अंतर पार करण्यासाठी 21.17 सेकंद वेळ लागला. या शर्यतीत कर्नाटकच्या अभिन देवडीगा (20.89 सेकंद) व व्ही. शशिकांत (20.97 सेकंद), ओडिसाचा अनिमेश कुजूर (20.99 सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रजत व ब्रॉंझपदक मिळवले.

\n

तायक्वांदोमध्ये महाराष्ट्राला तीन पदके
\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने गुरुवारी तीन कांस्यपदके पटकावली. महाराष्ट्राकडून प्रसाद पाटील, भारती मोरे आणि मृणाल वैद्य यांनी कांस्यपदके मिळवली.

\n

फुटबॉलमध्ये महाराष्ट्राची आगेकूच

\n

महाराष्ट्राच्या फुटबॉल संघाने स्पर्धेमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात मेघालय संघावर 2-1 असा दणदणीत विजय संपादन केला. मनदीप सिंग आणि अद्वैत शिंदे यांनी गोल करून महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राकडून मनदीपने 13व्या मिनिटाला आणि अद्वैतने 23व्या मिनिटाला गोल केले. मुख्य प्रशिक्षक डिसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने याआधीच्या सामन्यात गतउपविजेत्या केरळला 2-2 असे बरोबरीत रोखले होते.

\n

महाराष्ट्राच्या महिला संघाचा झारखंडकडून पराभव

\n

महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने स्पर्धेत झारखंडकडून 0-3 असा पराभव पत्करला. झारखंडच्या विजयात अलबेला राणी टोप्पोच्या दोन गोलचे महत्त्वाचे योगदान ठरले. या स्पर्धेत ब- गटातील या सामन्यात प्रमोदिनी लाक्राने चौथ्याच मिनिटाला मैदानी गोलद्वारे झारखंडचे खाते उघडले. त्यामुळे अक्षता ढेकळेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचा संघ दडपणाखाली खेळला. मग दुसऱ्या सत्रात 21व्या मिनिटाला अलबेलाने झारखंडची आघाडी 2-0 अशी वाढवली. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयश आले. चौथ्या सत्रात 58व्या मिनिटाला अलबेलाने दुसरा वैयक्तिक गोल नोंदवून झारखंडची आघाडी 3-0 अशी केली. महाराष्ट्राने पहिल्या सामन्यात यजमान गोव्याला 2-1 अशी धूळ चारली होती. महाराष्ट्राचा पुढील सामना शनिवारी पंजाबशी होणार आहे.

\n

रीकर्व्हमध्ये महाराष्ट्राची दावेदारी

\n

महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या रीकर्व्ह तिरंदाजी क्रीडा प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि ब्रॉंझ पदकांसाठी दावेदारी मजबूत केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने यजमान गोव्याला 6-0 असे नमवले. मग दुसऱ्या सामन्यात आसामचा 6-2 असा पराभव केला. यशदीप भोगे, शुकमनी बाबरेकर, सुमेध मोहोड, गौरव लांबे यांचा समावेश असलेला महाराष्ट्राचा संघ 6 नोव्हेंबरला झारखंडशी जेतेपदासाठी भिडणार आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाने तेलंगणा संघाला 6-0 असा फरकाने हरवले; परंतु हरयाणा संघाकडून हार पत्करावी लागली. मंजिरी अलोने, सृष्टी जोगदंड, शर्वरी शेंडे, नक्षत्रा खोडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राची तिसऱ्या क्रमांकासाठीची लढत 6 नोव्हेंबरला होईल. समीर म्हस्के आणि अमर जाधव महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक आहेत.

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"National Games 2023 : महाराष्ट्राचे पदकांचे दीड शतक पार; पदकतालिकेही अग्रस्थानी…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/mah.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/national-games-2023-maharashtra-shines-bright-at-the-top-with-an-incredible-161-medals#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/mah.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/national-games-2023-maharashtra-shines-bright-at-the-top-with-an-incredible-161-medals#webpage","name":"National Games 2023 : महाराष्ट्राचे पदकांचे दीड शतक पार; पदकतालिकेही अग्रस्थानी…","url":"https://www.dainikprabhat.com/national-games-2023-maharashtra-shines-bright-at-the-top-with-an-incredible-161-medals","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/national-games-2023-maharashtra-shines-bright-at-the-top-with-an-incredible-161-medals#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/mah.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/national-games-2023-maharashtra-shines-bright-at-the-top-with-an-incredible-161-medals#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/national-games-2023-maharashtra-shines-bright-at-the-top-with-an-incredible-161-medals","name":"National Games 2023 : महाराष्ट्राचे पदकांचे दीड शतक पार; पदकतालिकेही अग्रस्थानी…"}}]}}}

National Games 2023 : महाराष्ट्राचे पदकांचे दीड शतक पार; पदकतालिकेही अग्रस्थानी…