Rashmika mandanna-Vijay deverakonda : ‘नॅशनल क्रश’ लग्नाच्या बेडीत अडकली; ‘रश्मिका-विजय’चा ड्रीम लग्नसोहळा
‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.

Rashmika mandanna – Vijay deverakonda : ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानमधील ITC Mementos Udaipur येथे पारंपरिक तेलुगू रितीरिवाजांनुसार सकाळी त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. 24 फेब्रुवारीला संगीत आणि हळद समारंभ झाले होते.
या शाही लग्नाला केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि थरून भास्कर यांनीही नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. अनेक कलाकार मंडळींनी या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.
संगीत सोहळ्यात रश्मिकाने Pushpa 2: The Rule मधील ‘अंगारो’ गाण्यावर नृत्य करत सर्वांचे लक्ष वेधले. ‘विरोश’ हॅशटॅगद्वारे आधीच संकेत दिलेल्या या जोडीचे 4 मार्च रोजी हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शन होणार असल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
आता त्यांच्या अधिकृत लग्नाचे फोटो देखील या जोडीने सोशल मीडियावर शेअर केले असून, यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. विजयच्या आईने रश्मिकाला पारंपरिक बांगड्यांची भेट दिल्याचीही चर्चा आहे.





