AIMIM Convention : समान नागरी कायद्यासह हिंदू राष्ट्राला विरोध; MIM च्या राष्ट्रीय अधिवेशनात ठराव

नवी मुंबई – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन(एमआयएम) पक्षाच्या वतीने येथे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. यासाठी देशभरातील आमदार,खासदार व नगरसेवकांनी हजेरी लावली. आगामी निवडणुका समोर ठेवून यावेळी काही महत्वाचे ठराव मांडण्यात आले. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या अधिवेशनात समान नागरी कायद्यासह हिंदू राष्ट्राला विरोध करण्याच्या ठराव देखील यावेळी मांडण्यात आला.
राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आणि दलितांवरील हिंसाचाराचा निषेध करणारा ठराव मांडला. तसेच मागासलेल्या मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी करणारा ठरावही त्यांनी मांडला.
At the second day of our National Convention @aimim_national adopted important resolutions on various national issues including talking to Sangh Parivar, condemning violence against Muslims/Dalits & opposing Hindu Rashtra. Text of the resolutions 👇 pic.twitter.com/ZTrmb1VFaM
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 26, 2023
तसेच माजी आमदार वारिस पठाण यांनी समान नागरी कायद्याला विरोध करणारा ठराव मांडला. तसेच सय्यद असीम वकार यांनी लव्ह जिहाद कायद्याला विरोध करणारा ठराव यावेळी मांडला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/commerce-and-industry-minister-piyush-goyal-in-a-tweet-on-saturday-stated-that-there-is-no-ban-on-onion-exports-from-india-to-any-country/
राज्यातील तीन पक्षांसोबत युती?
पहिल्याच दिवशी मांडण्यात आलेल्या ठरावानुसार आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील तीन पक्षांसोबत एमआयएम युती चर्चा करत असल्याचे सांगण्यात आले. सद्या ही चर्चा प्राथमिक स्तरावर सुरु असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ते तीन पक्ष कोणते याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.




