National Championship 2024 (Sr. Women’s Hockey) : हॉकी महाराष्ट्रची विजयी सलामी…

Senior Women’s National Hockey Championship – केरळ हॉकीवर १०-० असा सहज विजय मिळवत हॉकी महाराष्ट्रने १४ व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेची दिमाखदार सुरुवात केली. सर्वाधिक ४ गोल करताना ऋतुजा पिसाळ हिने विजयात मोठा वाटा उचलला.
राज्य असो किंवा देशातर्फे खेळताना गोल करण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या ऋतुजाने विजयी सलामीबद्दल समाधान व्यक्त करतानाच, माझ्या प्रयत्नांमुळे सर्वांचे समाधान झाले याचा मोठा आनंद झाल्याचे म्हटले.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे बुधवारी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळला गेलेला सामना उपविजेत्या हॉकी महाराष्ट्रासाठी निःसंशयपणे खूप महत्वपूर्ण होताच. परंतु, २१ वर्षीय ऋतुजासाठी, तिने या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या अशाच कामगिरीच्या तुलनेचच हा क्षण होता. ओमानमध्ये जानेवारी यंदा झालेल्या एफआयएच वर्ल्ड फाइव्हज महिला विश्वचषक स्पर्धेत ऋतुजाने चार गोल करताना उपांत्यपूर्व फेरीत भारताला न्यूझीलंडवर ११-१ असा मोठा विजय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.
प्रत्यक्ष मैदानावर, हॉकी महाराष्ट्राने चांगलीच चमक दाखवली, पहिल्या हाफमध्ये पेनल्टी कॉर्नरवर तीन गोल करताना बी ग्रुपमधील पहिल्या सामन्यात तीन गुण वसूल केले. प्रियांका वानखेडेने चौथ्या मिनिटाला मिळालेल्या महाराष्ट्राचे गोल खाते उघडले. अक्षता ढेकळे हिने आठव्या आणि ऋतुजा पिसाळने (१८ व्या मिनिटाला) दहा मिनिटांच्या फरकाने पेनल्टी कॉर्नरद्वारे आणखी त्यात भर घातली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/national-championship-2024-sr-womens-hockey-bengal-scored-28-goals-against-gujarat/
दुर्गा शिंदे (२० व्या) आणि भावना खाडे यांनी (२६ व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करून पहिल्या हाफमध्ये ५-० अशी मोठी आघाडी घेतली. एंड बदलल्यानंतर हॉकी महाराष्ट्रने आणखी चार गोलांची भर घातली. ऋतुजा पिसाळने (४४ वे, ५३ वे, ५८ व्या मिनिटाला) तीन, तर वैष्णवी (४६ व्या मिनिटाला) आणि योगिता बोराने (५१ व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करून आरामात विजय मिळवला.





