नथुराम गोडसे राष्ट्रवादी होते – भाजप आमदार
Updated On:

नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हणत वादा उभा केला होता. आता आणखी एका भाजप आमदाराने गोडसे यांना राष्ट्रवादी ठरवले आहे.
इंदौरमधील भाजप आमदार उषा ठाकूर यांनी नथुराम गोडसेंना राष्ट्रवादी म्हंटले आहे. नथुराम गोडसेंचे तुम्ही समर्थन करता का? या प्रश्नावर उषा ठाकूर म्हणाल्या कि, गोडसे राष्ट्रवादी होते. विचार करायला हवा कि, एक व्यक्ती संपूर्ण जीवनभर राष्ट्राची चिंता करतो. त्यावेळी कोणती परिस्थिती निर्माण झाली कि त्यांना गांधींची हत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी म्हंटले.





