नाकात नथ आणि नऊवारी साडी; अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा पारंपारिक लुक

मुंबई – मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. तिचे नवनवे अंदाज प्रेक्षकांच्याही खूप पसंतीस पडत असतात. नुकतेच तिने तिचे काही फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचा हा नवा लुक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने पारंपरिक दागिने घालून छान नऊवारी साडी नेसली आहे. सोबतच देवदास सिनेमातील ‘बैरी पिया बड़ा बेदर्दी..’ हे गाणं तिने बॅकग्राऊंडला प्ले केलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थनाच्या प्रचंड मनमोहक अदाने अनेकांना घायाळ केले आहे. त्यामुळे सध्या तिच्या या व्हिडीओवर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे.
https://www.instagram.com/reel/Ct3GwHjKA30/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, प्रार्थनाने याआधी पवित्र रिश्ता आणि क्राईम पेट्रोलसारख्या नॅशनल टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय मितवा, कॉफी आणि बरंच काही, बॉडीगार्ड, मिस्टर ॲन्ड मिसेस सदाचारी, फुगे यासारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही तिची मालिका देखील चांगलीच चर्चेत राहिली होती. यात प्रार्थना आणि श्रेयश तळपदेच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.





