Nashik News – लग्न झाल्यानंतर पाच दिवसांत नातेवाइकाचे निधन झाल्याचे सांगत नववधूने 2 लाख 73 हजारांच्या दागिन्यांसह पलायन करत कर्नाटक येथील एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम जैन (रा. बेळगाव, कर्नाटक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित जितू जैन, त्याची पत्नी आणि नववधू तेजस्विनी आणि तिची आई, महादेव आण्णा यांनी संगनमत करत 23 ऑक्टाेबरला जेलरोड येथील एका हाॅटेलमध्ये संशयित तेजस्विनी (पूर्ण नाव नाही) या युवतीसोबत लग्न जमवले. नववधूकरिता जैन यांनी सोन्याच्या बांगड्या, चांदीचे पैंजण, अंगठी असे 2 लाख 73 हजारांचे दागिने लग्नात दिले. लग्नाचा सर्व खर्च केला. लग्न झाल्यानंतर काही दिवस हाॅटेलमध्ये राहिले. यानंतर कर्नाटक येथे जाणार असल्याचे जैन यांनी सांगीतले. संशयितांनी 27 ऑक्टाेबरला संगनमत करत नववधूच्या नातेवाइकाचे निधन झाल्याचे सांगून अंत्यविधी करून परत येतो, असे सांगून पलायन केले.