Nashik Crime : नाशिकमध्ये ‘खरात पार्ट 2’; ऑफिसबॉयनेच मालकाला अडकवलं, महिलांचे 121 अश्लील व्हिडिओ उघडकीस

मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एरंडे याने विविध हॉटेल्समध्ये अनेकदा आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्या महिलेने तक्रारीत केला.

Updated On:
Nashik Crime : नाशिकमध्ये ‘खरात पार्ट 2’; ऑफिसबॉयनेच मालकाला अडकवलं, महिलांचे 121 अश्लील व्हिडिओ उघडकीस

Nashik Crime – नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे प्रकरण संपूर्ण देशभर चर्चेत आहे. भोंदू अशोक खरातने शेकडो महिलांचे लैगिंक शोषण केल्याचे समोर आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच नाशिकमध्ये अशाच प्रकारे महिलांच्या लैगिंक शोषणासंबंधी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘खरात पार्ट 2’ अशी चर्चा नाशिकमध्ये या प्रकरणाविषयी सुरु आहे.

खंडणीच्या एका तक्रारीमुळे नाशिक येथील एका ज्येष्ठ नागरिकाची मोठी पंचाईत झाली आहे. त्याच्या विरोधात सुरू असलेल्या तपासात १२१ अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. यानंतर पीडितांपैकी एका महिलेने पुढे येऊन लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे त्या ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यात आली.

यापूर्वी, या ज्येष्ठ नागरिकाच्या कार्यालयातून टॅब्लेट चोरल्याचा आणि त्याचे खाजगी फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून १२ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपातून पोलिसांनी चार जणांना अटक केली होती.

Ashok Kharat Case

Ashok Kharat Case

पोलिसांनी आकाश बाकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई आणि श्रीपत शिंदे या चार जणांना अटक केली. पोलिसांनी या चार जणांकडून चार मोबाइल फोन, दोन पेन ड्राइव्ह आणि एक मेमरी कार्ड जप्त केले होते. अटक केलेल्या चौघांच्या टोळीमधील एक संशयित हा तक्रारदाराकडे ‘ऑफिसबॉय’ होता.

या उपकरणांची तपासणी केली असता, तक्रारदार रवींद्र गणपत एरंडे याच्या ओळखीच्या महिला आणि मित्रांचे १२१ अश्लील व आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स त्यात आढळून आल्या आणि या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले.

पीडितांपैकी एका महिलेने एरंडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. आपल्या मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एरंडे याने विविध हॉटेल्समध्ये अनेकदा आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्या महिलेने तक्रारीत केला.

या तक्रारीनंतर, शुक्रवारी एरंडेला अटक करण्यात आली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरंडेने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ चित्रीत केले होते, असे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

एरंडे याच्या विरोधात काही तक्रारी असल्यास निर्भीडपणे पुढे यावे, तसेच त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, स्वयंघोषित पत्रकार असलेला तक्रारदार रवींद्र गणपत एरंडे हा २००३ पासून अनेक महिलांना उद्योग उभारणीचे आमिष दाखवून त्याने आपल्या केबिनमध्ये बोलावले.

त्यांच्या अडचणींचा फायदा घेत अत्याचार केले. या अत्याचाराचे त्याने छुप्या रीतीने रेकॉर्डिंग केले. हे सर्व व्हिडिओ त्याने टॅब आणि हार्डडिस्कमध्ये साठवून ठेवले होते.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Salunkhe : संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर गंभीर गुन्हा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

2026-10-03 18:09:53

Rahul Salunkhe : संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर गंभीर गुन्हा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

Actor Dino Morea Arrested : अभिनेता दिनो मोरियाला अटक; राहत्या घरातूनच घेतलं ताब्यात, मिठी नदी प्रकरण नेमकं काय? 

2026-10-02 18:53:24

Actor Dino Morea Arrested : अभिनेता दिनो मोरियाला अटक; राहत्या घरातूनच घेतलं ताब्यात, मिठी नदी प्रकरण नेमकं काय? 

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! आंदोलनापूर्वी मनसेच्या 'या' बड्या नेत्याला अटक

2026-10-02 17:32:46

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! आंदोलनापूर्वी मनसेच्या 'या' बड्या नेत्याला अटक

Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ढोल वादनाचा ठेका

2026-09-25 13:48:18

Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ढोल वादनाचा ठेका

Mahadev Betting App : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी सीबीआयची कारवाई मोठी कारवाई; मुख्य सूत्रधार अभिषेक कुमारला अटक

2026-09-24 21:15:03

Mahadev Betting App : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी सीबीआयची कारवाई मोठी कारवाई; मुख्य सूत्रधार अभिषेक कुमारला अटक