विक्रम लॅंडरचा अद्याप ठावठिकाणा मिळाला नाही, नासाचे स्पष्टीकरण
Updated On:

नवी दिल्ली – भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेतील विक्रम लॅंडरबाबत नासाने मोठा खुलासा केला आहे. नासाने नुकतेच विक्रम लॅंडरबाबत एक माहिती जारी केली आहे. त्यात त्यांनी म्हटलयं की ‘ऑर्बिटरद्वारे मिळालेल्या ताज्या फोटोंमध्ये चांद्रयान 2 च्या लॅंडरचा काहीच ठावठिकाणा मिळालेला नाही. नासाने पुढे म्हटलयं की ज्यावेळी आमच्या ऑर्बिटरने फोटो घेतला त्याचवेळी लॅंडर अंधारामध्ये किंवा सावलीमध्ये लपले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही’.
नासाचे प्रोजेक्ट शास्त्रज्ञ नोह एडवर्डने म्हटलयं की ‘नासाच्या ऑर्बिटरने 14 ऑक्टोबरला चांद्रयान 2 च्या विक्रम लॅँडरचा ज्या भागातून संपर्क तुटला त्या भागातून फोटो घेतले. मात्र, आम्हाला असा एक ही फोटो मिळाला नाही की ज्यामध्ये विक्रम लॅंडरची छबी दिसेल किंवा त्याचा ठावठिकाणा दिसू शकेल’.





