अहमदाबाद – करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका संपूर्ण देशाला बसला आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या चुलती नर्मदाबेन मोदी यांचे आज करोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर शहरातील एका शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.
“आमच्या काकी नर्मदाबेन या गेल्या १० दिवसांपासून शासकीय रुग्णालयामध्ये दाखल होत्या. त्यांना करोनाची बाधा झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला” अशी माहिती मोदींचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी दिली.
नर्मदाबेन यांचे पती जगजीवनदास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे बंधू होते. त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रल्हाद मोदी यांनी दिली.