नरहरी झिरवाळांचा मुलगा गोकुळच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

नाशिक : मागच्या काही दिवसांपासून विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ आणि त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. त्याला कारणदेखील तसेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली होती. यामुळे गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटात जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यानंतर आता जयंत पाटील आणि गोकुळ झिरवाळ यांच्याभेटीसंदर्भात एक मोठा गौप्य्स्फोट केला आहे.
काय म्हणाले नरहरी झिरवाळ?
आता नरहरी झिरवाळ यांनी गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटील यांच्या भेटीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील आणि गोकुळ झिरवाळ यांच्या भेटीमागील सत्य नरहरी झिरवळ यांनी आज सांगितले आहे. जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले होते. जयंत पाटील माझा नेता आहे त्यांचा जाऊन सत्कार कर, अशा सूचना गोकुळला दिल्या होत्या. तिथे त्याला विचारले बापासारखे त्याच्यात काही गुण आहेत. म्हणून त्याने निवडणूक लढविण्याचे सांगितले होते. त्यामुळे संभ्रम तयार झाला, पण आता तो जागेवर आहे आणि कायमस्वरूपी जागेवर राहणार आहे, असे नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ यांची दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. या मतदारसंघातून शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले हे निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र हि जागा अजित पवार गटाकडे असल्याने धनराज महाले काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





