‘मी आधी आदिवासी नंतर..’ मंत्रालयाच्या जाळीवर उडी घेतल्यानंतर नरहरी झिरवळ झाले,’भावूक’

Narhari Jhirwal । आमच्या आदिवासी समाजाचे शंभराहून अधिक मुलांनी काही बरे वाईट करायला नको म्हणून माझी शासनाला विनंती आहे की, शासनाने तत्काळ तिथे जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षा द्यावी. आधी मी आदिवासी आहोत आणि नंतर विधानसभा उपाध्यक्ष झालो आहे. ज्या आदिवासी समाजाने आम्हाला निवडून दिले आहे. त्यांचे सण उत्सव सगळे इकडेच होत असतील तर आमचा काय उपयोग आहे? 14 दिवसांपासून आमचे मुले आंदोलन करत आहेत. एखाद्या नेत्याने तरी त्यांच्याकडे येऊन पाहिले का? असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी उपस्थित केला आहे.
#WATCH | NCP leader Ajit Pawar faction MLA and deputy speaker Narhari Jhirwal jumped from the third floor of Maharashtra’s Mantralaya and got stuck on the safety net. Police present at the spot. Details awaited pic.twitter.com/nYoN0E8F16
— ANI (@ANI) October 4, 2024
धनगर समाजाच्या आरक्षणावरून आंदोलन करणारे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ मंत्रालयाच्या छतावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र उडी मारल्यानंतर झिरवळ सुरक्षा जाळ्यात अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करताना त्यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारली. यानंतर त्यांना पोलिसांकडून बाहेर काढण्यात आले. यावेळी मीडियाशी संवाद साधतांना नरहरी झिरवाळ यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
नेमकं काय घडलं ?
नरहरी झिरवाळ हे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते, मात्र त्याठिकाणीही त्यांची भेट होऊ शकली नाही, असे सांगण्यात येत आहे. यानंतर ते आज पुन्हा मंत्रालयात पोहोचले, तिथे त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. या रागातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. नरहरी झिरवाळ यांच्यानंतर इतर काही आदिवासी आमदारांनीही उडी घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे मंत्रालयात मोठी खळबळ उडाली होती. यावेळी पोलिसांनी सर्वांना जाळ्यातून बाहेर काढले.
संरक्षक जाळीवर उडी मारणारे नेते कोण?
नरहरी झिरवाळ
किरण लहामटे
राजेश पाटील
हेमंत सावरा





