ठाकरे गटाचे दोन नवनिर्वाचित खासदार आमच्या संपर्कात”; शिंदे गटाच्या ‘या’ खासदारांचा दावा

Naresh Mhaske ON MP । राज्यात मागच्या दोन-तीन वर्षात नवीन राजकारण पाहायला मिळाले. सुरुवातील एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि नेते फोडून आपला स्वतंत्र गट निर्माण केला आहे. त्याचे पडसाद यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेकडून ठाकरे गटाचे नव्याने निवडून आलेले दोन खासदार आपल्याकडे वाळवून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी हा खळबळजनक दावा केलाय.
ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी दोन आमच्या संपर्कात Naresh Mhaske ON MP ।
नरेश म्हस्के यांनी ठारे गटाचे नवनिर्वाचित एकूण 9 खासदार निवडून आले होते. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटाच्या या दोन आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितले आहे.
कारवाईचा धोका टाळण्यासाठी धावाधाव Naresh Mhaske ON MP ।
या विषयी बोलताना “मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितले. मात्र, पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाईचा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असे या दोन खासदारांचे म्हणणे असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.
नरेश म्हस्के यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील अनेक आमदार माघारी येतील, अशी चर्चा होती. मात्र, आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे नव्याने निवडून आलेले खासदारच फोडण्याची तयारी सुरु झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.





