Narendra Modi : तरुण मनांच्या कर्तृत्वाला कोणतीही मर्यादा नसते; नरेंद्र मोदींनी व्यक्त केले मत
जेव्हा तुम्ही राष्ट्र प्रथम या मानसिकतेने वाटचाल करता, तेव्हा निःशंकपणे तुमच्या समोर नव्या संधींची दारे खुली होतात, ज्याचा देशाला निश्चितच मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.

Narendra Modi : राष्ट्रे जेव्हा आपल्या विचारांच्या सीमा ओलंडतात तेव्हाच त्यांना त्यांच्या क्षमतांची खऱ्या अर्थाने जाणीव होते. गेल्या १२ काही वर्षांत भारताने ‘मर्यादा झुगारा, नव्या शक्यतांची दारे खुली करा’ हा संदेश जगाला ठामपणे दिला आहे.
जेव्हा तुम्ही राष्ट्र प्रथम या मानसिकतेने वाटचाल करता, तेव्हा निःशंकपणे तुमच्या समोर नव्या संधींची दारे खुली होतात, ज्याचा देशाला निश्चितच मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.
पश्चिम बंगालमधील आयआयटी खरगपूरच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. या सोहळ्याला संबोधित करताना मोदी म्हणाले, विकसित भारत संकल्पना साकार करण्यासाठी पुढील दोन दशके महत्त्वपूर्ण असतील. भारताने मर्यादा तोडून शक्यतांना वाव देण्याचा आपला निर्धार स्पष्टपणे जाहीर केला असल्याचे त्यांनी (Narendra Modi) सांगितले.
एकेकाळी गरिबी हे एक न पेलवणारे आव्हान मानले जात होते. एकापाठोपाठ आलेल्या कॉंग्रेस सरकारांनी ती समूळ नष्ट करण्याच्या घोषणा दिल्या, परंतु देशातून गरिबी दूर करण्यात ते अपयशी ठरले. गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत सुमारे ५० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे. ही काही छोटी उपलब्धी नाही.
मर्यादा तोडण्यावर विश्वास ठेवणाऱ्या मानसिकतेचा हा परिणाम आहे, असे ते म्हणाले. गेल्या चार वर्षांत देशभरात अनेक सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू झाले आहेत. भारताने चिप्सची निर्यात सुरू केली असून यापैकी अनेक प्रकल्पांचे नेतृत्व आणि अंमलबजावणी आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
अंतराळ क्षेत्र तरुणांसाठी खुले
भारताची अंतराळ परिसंस्था पूर्वी इस्रोपुरतीच मर्यादित होती आणि या क्षेत्रात प्रवेशाच्या संधी अत्यंत मर्यादित होत्या. आता भारताचे अंतराळ क्षेत्र तरुणांसाठी खुले करण्यात आले आहे. आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी पवन यांनी स्कायरूट एरोस्पेसची स्थापना करून देशाल पहिले खासगी रॉकेट प्रक्षेपित करण्याचा मान मिळवून दिला. त्याचबरोबर, आज अनेक अंतराळ स्टार्टअप्स देशाच्या अंतराळ कार्यक्रमाला गती देत आहेत, असे पंतप्रधान (Narendra Modi) म्हणाले.






