Narendra Modi : क्वॉड ही उपाययोजना पुरवणारी विश्वसनीय भागीदारी; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मत
भारतासाठी क्वॉड ही हिंद-प्रशांत क्षेत्रातील सागरी सुरक्षा, पुरवठा साखळी, नवीन तंत्रज्ञान आणि आपत्ती प्रतिसादासारख्या क्षेत्रांमध्ये विधायक आणि विश्वसनीय भागीदारी आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज व्यक्त केले.

Narendra Modi : भारतासाठी क्वॉड ही हिंद-प्रशांत क्षेत्रातील सागरी सुरक्षा, पुरवठा साखळी, नवीन तंत्रज्ञान आणि आपत्ती प्रतिसादासारख्या क्षेत्रांमध्ये विधायक आणि विश्वसनीय भागीदारी आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज व्यक्त केले.
आसियान शिखर परिषदेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या क्वॉड गटाच्या बैठकीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस आणि जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची यांच्यासमवेत ते सहभागी झाले होते. गेल्या वर्षी जानेवारीपासून क्वॉड गटाच्या सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री पाचवेळा भेट घेतली आहे.
यातूनच आपली राजकीय इच्छाशक्ती आणि भागीदारीप्रती आपली सामायिक वचनबद्धताही दिसून येते. आजच्या भेटीमुळे आपल्या सहकार्याच्या पुढील टप्प्यासाठी ठोस उद्दिष्टे निश्चित करण्यास मदत होईल, याची आपल्याला खात्री वाटत असल्याचेही पंतप्रधानांनी (Narendra Modi) सांगितले.
आशिया खेडातील चीनच्या वाढत्या प्रभावाला नियंत्रित करण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या जगाच्या चार कोपऱ्यातील प्रमुख देशांची चतुष्कोनीय आघाडी असलेल्या क्वॉड गटाच्या माध्यमातून मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद-ृप्रशांत क्षात्रातील सागरी सहकार्य, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक स्थैर्याला प्रोत्साहन देण्याचे काम (Narendra Modi) केले जाते.






