Narendra Modi : युद्धविरामानंतर पंतप्रधान मोदी 8 वाजता देशाला संबोधित करणार; कोणती घोषणा होणार?

Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता संपूर्ण देशाल संबोधित करणार आहेत. सध्याच्या युद्धजन्य काळात सगळीकडे अनिश्चिततेचं वातावरण आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव पूर्णपणे मिटलेला नाही.
असे असतानाच आता पंतप्रधान आज देशाशी बातचित करणार असून यावेळी ते नेमकं काय बोलणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तसेच कोणते कठोर निर्णय ते घेतील का? हे पाहणे देखील महत्वाचे आहे.
आज भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुख दलाच्या पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत आणि पाकिस्तानमधील सद्यस्थितीबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी भारतीय लष्कराने पाक लष्कराशी आमचा लढा नसल्याचे स्पष्ट केले. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना लक्ष केले होते.
Prime Minister Narendra Modi will address the nation at around 8 PM today. pic.twitter.com/NobQiY66Nh
— ANI (@ANI) May 12, 2025
पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले की, “आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्ताननं दहशतवाद्यांना पाठिंबा देणं योग्य मानले. म्हणून, पाकिस्ताननं ही लढाई स्वतःची लढाई बनवली म्हणून त्यांना प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं. असं सांगितलं.
भारतीय सैन्य दलाकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सीमारेषेवरील कारवायांची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासीयांना संबोधित करणार असून पाकिस्तानला काय इशारा देतात हे पाहावे लागेल.
दरम्यान, भारत-पाकच्या डिजीएमओच्या चर्चेची वेळ पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही डिजीएमओ संध्याकाळी चर्चा करतील, अशी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या चर्चेवर देखील सर्वांची नजर असणार आहे.





