Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांची झेलेंस्की यांच्याशी फोनवरून चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेंस्की यांच्यात सोमवारी दूरध्वनीवरून संवाद झाला.
Updated On:

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेंस्की यांच्यात सोमवारी दूरध्वनीवरून संवाद झाला. रशिया- युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी संवादाच्या गरजेवर यावेळी दोन्ही नेत्यांनी भर दिला. तसेच अन्नधान्याच्या सुरक्षित सुरक्षित सागरी वाहतूकीवरही दोन्ही नेत्यांनी भर दिला.
रशियाबरोबर अलिकडच्या काळात झालेल्या वाटाघाटींविषयी झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांना माहिती दिली. तर पंतप्रधान मोदींनी आपल्या मानव केंद्रीत भूमिकेचा आणि हा संघर्ष केवळ संवाद आणि मुत्सदेगिरीद्वारेच सोडवला जाऊ शकतो, या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
शांतामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी सर्व उपाययोजनांमध्ये भारत सकारात्मक योगदान देईल, याची ग्वाही देखील पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) झेलेन्स्की यांना यावेळी दिली. अनेक क्षेत्रामधील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठीच्या पर्यायांबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.






