Narendra Modi : महिला आरक्षण कोणताही पक्ष रोखू शकत नाही; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा निर्धार अढळ असून, विरोध करणारे कोणतेही पक्ष हा निर्णय रोखू शकणार नाहीत, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी व्यक्त केला.

Narendra Modi : लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा निर्धार अढळ असून, विरोध करणारे कोणतेही पक्ष हा निर्णय रोखू शकणार नाहीत, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी व्यक्त केला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ संदेशातून त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली.देशातील महिलांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू असून, आरक्षणाच्या अंमलबजावणीतील प्रत्येक अडथळा दूर केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी (Narendra Modi) दिली.
नारी शक्तीला सक्षम करण्याचा आमचा संकल्प अढळ आहे. महिला आरक्षणाच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा आम्ही निश्चितपणे दूर करू, याची देशातील प्रत्येक महिलेला खात्री देऊ इच्छितो. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देणाऱ्यांचा उत्साह मोठा असून, सरकारचे धैर्य अदम्य आणि संकल्प दृढ आहे, असेही त्यांनी नमूद केले.
महिलांना संसद आणि राज्य विधानसभांमध्ये अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळण्याच्या मार्गात विरोधी पक्ष अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. महिला आरक्षणाला विरोध करणारे पक्ष देशातील नारी शक्तीला राजकीय निर्णयप्रक्रियेत अधिक सहभाग घेण्यापासून कधीही रोखू शकणार नाहीत. आता हा बदल घडण्याचा केवळ वेळेचा प्रश्न असल्याचे मोदी (Narendra Modi) म्हणाले.






