Narendra Modi : ‘मन की बात’ ही तीर्थयात्राच; नरेंद्र मोदींनी व्यक्त केले मत
मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात ही एक तीर्थयात्राच आहे. या कार्यक्रमामुळे सामान्य भारतीयांचे प्रयत्न समजून घेण्याची आणि त्यांच्या योगदानाची दखल घेण्याची संधी मिळाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले.

Narendra Modi : मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात ही एक तीर्थयात्राच आहे. या कार्यक्रमामुळे सामान्य भारतीयांचे प्रयत्न समजून घेण्याची आणि त्यांच्या योगदानाची दखल घेण्याची संधी मिळाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले.
मन की बातच्या 139व्या भागाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी आठवण करून दिली की, 12 वर्षांपूर्वी विजयादशमीच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. तेव्हापासून हा प्रवास अखंडपणे सुरू आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, बारा वर्षांपूर्वी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आपण मन की बातची सुरुवात केली होती. तेव्हापासून आपला हा प्रवास अखंडपणे सुरू आहे. या प्रवासात तुम्ही सर्वजण माझे सहप्रवासी आणि मार्गदर्शकही राहिला आहात. या कार्यक्रमामुळे देशभरातील सामान्य लोकांची मेहनत, धैर्य, बांधिलकी, समर्पण आणि सेवाभाव अधोरेखित करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्यासाठी मन की बात हा आपल्या देशातील सामान्य माणसाच्या मेहनतीचा, धैर्याचा, बांधिलकीचा, समर्पणाचा आणि सेवाभावाचा गौरव करण्याची एक अद्भुत संधी ठरली आहे. पंजाबचा संदर्भ देताना पंतप्रधानांनी पारंपरिक शेती पद्धतींचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या एका उपक्रमाविषयी सांगितले. त्यांनी या उपक्रमाचे वर्णन प्रेरणादायी प्रयत्न (Narendra Modi) असे केले.
तसेच उत्तराखंडमध्ये हेवल नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि नैसर्गिक जलस्रोतांचे पुनर्संचयित करण्यासाठी स्थानिक समुदायाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला. पारंपरिक पद्धतींचे जतन करणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे यासाठी व्यक्ती तसेच समुदायांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर या कार्यक्रमात भर देण्यात आला.
शेतकऱ्यांसाठी जगभरातील बाजारपेठा खुल्या
सणासुदीच्या या काळात तुम्हा सर्वांनी आपल्या आजूबाजूला एक बदल नक्कीच अनुभवला असेल. आता लोक खरेदी करताना स्वदेशी उत्पादनांना अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. व्होकल फॉर लोकल ही भावना आता आपल्या उत्पादनांना जगभरातल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवत आहे.
बिहार येथील पूर्णियामधील मखाना आता ग्रीस देशापर्यंत पोहोचत आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गी येथील तूरडाळ आता मालदीवला पाठवली जात आहे. म्हणजेच, भारतातील शेतकऱ्यांसाठी जगभरातल्या नवनवीन बाजारपेठा खुल्या होत आहेत.






