पुणे जिल्हा | श्री वल्लभ नागरी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी नरेंद्र कासार

जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नरमधील श्री वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी नरेंद्र एकनाथ कासार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सहायक निबंधक कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी निलेश ढोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष सुमित परदेशी , माजी उपाध्यक्ष नितीन गांधी, संचालक भाऊ कुंभार, उज्वला शेवाळे, बिहारीलाल परदेशी, उत्तम घुले, तुषार लाहोरकर, सुहास चिखले, सखाराम कडलक, वैष्णवी चतुर, संजय ढेकणे, सखाराम घोटकर, नितीन गाजरे उपस्थित होते.
सन १९९८ मध्ये वल्लभ पतसंस्थेची स्थापना झालेली असून जुन्नर तालुका कार्यक्षेत्र आहे. संस्थेचे ८१८८ इतके सभासद असून २६ कोटींहून अधिक रकमेच्या ठेवी संस्थेमध्ये आहे. संस्थेला ऑडिट वर्ग अ असून संस्थेच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम दरवर्षी राबविले जातात.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके, युवा नेते अमित बेनके, अशोक गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज करणार असल्याचे नवनियुक्त उपाध्यक्ष नरेंद्र कासार यांनी निवडीनंतर जाहीर केले.





