ज्येष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन ; 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Narendra chapatgaonkar Death । ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते. छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी साहित्यविश्व आणि न्यायव्यवस्थेतून महान व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी सन 1961 ते 62 मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले. मराठवाडा, मराठवाड्यातील सामाजिक वास्तव उर्वरित महाराष्ट्रात पोहोचवण्यात नरेंद्र चपळगावकर यांचा मोठा सहभाग होता.
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम Narendra chapatgaonkar Death ।
नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले. बीडमधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी लेखन केले. 16 वर्षे वकिली केल्यानंतर मुंबईत काही काळ वकिली केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायपीठ स्थापन झाल्यावर त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
न्यायालयीन कारकीर्द Narendra chapatgaonkar Death ।
चपळगावकर यांनी 1962 ते 1978 या काळात बीडमध्ये वकिली केली. त्यानंतर 1979 ते 1881 दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. आणि 1981 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची 19 जानेवारी 1990 मध्ये नियुक्ती झाली आणि कायमचे न्यायाधीश म्हणून 20 नोव्हेंबर 1990 रोजी नियुक्ती झाली. 10 एप्रिल 1999 रोजी ते निवृत्त झाले. मराठी साहित्यातला मोठा विचारवंत आणि अभ्यासक असणाऱ्या नरेंद्र चपळगावकरांनी मराठी साहित्यविश्वात मोलाची भर टाकली आहे. दरम्यान, त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्व आणि न्यायव्यवस्थेतील निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.





