Narayangaon News : गांजा विक्री व जुगार अड्ड्यावर नारायणगाव पोलिसांची धडक कारवाई; 19 जणांवर गुन्हे दाखल
पुणे ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव (Narayangaon News) पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ व बेकायदेशीर जुगाराविरोधात दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या.

Narayangaon News : पुणे ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव (Narayangaon News) पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ व बेकायदेशीर जुगाराविरोधात दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये गांजा जप्त करण्यात आला असून जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे २६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत धनगरवाडी (ता. जुन्नर) येथील लिलाबाई दिनकर भोर यांच्या राहत्या घरालगतच्या शेत परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत ११८ ग्रॅम वजनाचा, सुमारे १ हजार १८० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी वैभव वसंत गावडे (वय ४६, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध (Narayangaon News) गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील करीत आहेत.
दुसऱ्या कारवाईत वळणवाडी (ता. जुन्नर) येथील जगदीश फुलसुंदर यांच्या घरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत रोख १९ हजार रुपये, तसेच सुमारे २६ लाख ४५ हजार रुपये किमतीची वाहने असा एकूण २६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी १८ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईतील आरोपींमध्ये (Narayangaon News) अजय रामदास सांडभोर, दीपक रंगलाल राठोड, पांडुरंग हणुमंत गायकवाड, विजय सुभाष शिंदे, गणेश किशोर कांबळे, अक्षय रमेश तलवार, दिनेश पोपट गुंजाळ, सुनील भिमाजी गोफणे, मिनानाथ शशिकांत घाडगे, सचिन भिमाजी गोफणे, सोमनाथ सुदाम भुजबळ, अन्वर इब्राहीम शेख, अनिकेत जगदीश नाईकवाडे, अविनाश दादाभाऊ पाचपुते, अजय शांताराम जाधव, नारायण तुकाराम राठोड यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे.
या दोन्ही कारवायांमुळे अमली पदार्थांची विक्री आणि बेकायदेशीर जुगार व्यवसायावर आळा घालण्याच्या दृष्टीने नारायणगाव पोलिसांनी प्रभावी पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.






