नारायण राणे यांनी स्पष्टच सांगितलं,’मराठा समाजाचे खच्चीकरण अन् इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार’

Maratha Reservation – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या असून त्यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी राज्य सरकारने या अधिसूचनेवर येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या हरकती आणि सूचना आल्यानंतर अध्यादेशासाठी मसुदा तयार करण्यात येणार आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते याच मुद्द्यांवर भाजपाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. याआधीही भाजप नेते नारायण राणे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारमधीलच काही नेत्यांचा प्रखर विरोध होता.
नारायण राणे म्हणाले,’मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ दाखले देऊ नयेत आणि ही ९६ कुळी मराठा समाजाची मागणी नाही”, असं नारायण राणे यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. नारायण राणे यांनी ट्विटरवर ‘मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन.’ असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
नारायण राणे यांचे ट्विट
मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी…
— Narayan Rane (@MeNarayanRane) January 28, 2024





