Nandurbar News : धक्कादायक ! नंदुरबारमध्ये 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar News) समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील चाळीस विद्यार्थी जेवणानंतर आजारी पडले असून, त्यापैकी 25 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिली.

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar News) समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील चाळीस विद्यार्थी जेवणानंतर आजारी पडले असून, त्यापैकी 25 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिली. तसेच, सर्व बाधित मुलांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले.
सेठी यांनी शनिवारी शहादा येथील रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा (Nandurbar News) आढावा घेतला आणि सांगितले की, मुलांना अन्नातून विषबाधा आणि जठरदाह या दोन्हींचा एकत्रित त्रास झाल्याचे निदान झाले आहे. शहादा, जिथे सध्या आमचे समाज कल्याण वसतिगृह आहे, तेथील 40 मुलांना अन्नातून विषबाधा आणि जठरदाह या दोन्हींचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यांच्यापैकी पंचवीस जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वीस जण शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात (Nandurbar News) असून, पाच मुलांना ऑक्सिजन आणि रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व 25 मुलांची प्रकृती स्थिर असून, मी डॉक्टरांकडून नियमितपणे माहिती घेत आहे, असे सेठी यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या बहुतेक विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर झाली असून निरीक्षणानंतर त्यांना घरी सोडले जाण्याची शक्यता आहे.






