Nandurbar Accident । नंदुरबारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहन चालवताना चालकाला गाडीतच हृदयविकाराचा जोरदार झटका आला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताविषयी समोर आलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जी जे 26 ए ई 5786 या क्रमांकाची कार नंदुरबारजवळून जात असताना वाहनचालकाला चालत्या गाडीतच ह्रदयविकराचा झटका बसला. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्यावरील चौघांना जोरदार धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन जखमी Nandurbar Accident । या अपघातमध्ये यात एका साठ वर्षीय भंगार विक्रेता आणि आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर रस्त्याने पायी जाणारे आई आणि मुलगा देखील गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच नंदुरबार पोलिसांना घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. युक्तिवाद करताना वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू Nandurbar Accident । दरम्यान, नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद करताना वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिवाणी प्रकरणावर जिल्हा न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना वकील तलत इक्बाल कुरैशी (Talat Iqbal Qureshi) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. तेव्हा न्यायाधीश एस. बी. पवार (S B Pawar) यांनी त्यांना त्यांच्या खासगी गाडीतून तातडीने रुग्णालयात (Hospital) नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.