राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने पटकावला ‘फेमिना मिस इंडिया 2023’चा ताज

नवी दिल्ली – राजस्थानच्या नंदिनी गुप्ता हिने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 चा ताज जिंकला आहे. तिच्यासोबत दिल्लीची श्रेया पुंजाने दुसरा क्रमांक पटकावला तर मणिपूरच्या थोनावजाम स्ट्रेला लुआंगला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेचा ग्रँड फिनाले काल मणिपूर येथे संपन्न झाला.
19 वर्षीय नंदिनी मूळची देशातील सर्वात मोठं कोचिंग हब असलेल्या कोटा येथील रहिवासी आहे. नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केलेली आहे. मेहनतीत सातत्य आणि कष्टाळूपणामुळे आज तिने विजयचा क्राऊन मिळवण्यात यश मिळवल.आता ती मिस वर्ल्डसाठी देखील तयारी करणार असल्याचं बोललं जात आहे.
भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेचा 59 वा सीजन इनडोअर स्टेडियम, खुमन लम्पक, इंफाळ, मणिपूर येथे आयोजित करण्यात आला होता.. या सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी अनेक माजी विजेत्यांनी आपले दमदार परफॉर्मन्स दिले. शोमध्ये आणखी मनोरंजनाची भर घालत, मनीष पॉल आणि भूमी पेडणेकर यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
View this post on Instagram
या कार्यक्रमाचे परीक्षण नेहा धुपिया, बॉक्सिंग आयकॉन लैश्राम सरिता देवी, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक हर्षवर्धन कुलकर्णी आणि प्रख्यात डिझायनर रॉकी स्टार आणि नम्रता जोशीपुरा यांनी केलं. या सौंदर्य स्पर्धेकडे देशभरातील तरुणाईचं लक्ष होत. या स्पर्धेत 29 राज्यांचे प्रतिनिधी आले होते त्यामधील तीस जणांची निवड करण्यात आली होती. या सर्वांना मागे टाकून नंदिनीने विजेत्याचा ताज पटकावत सर्वांची मन जिंकली.


