नांदेड: अंगावर वीज कोसळून महिला ठार
Updated On:

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील अंबुलगा येथे अंगावर वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. चंद्रकलाबाई व्यंकटराव झाडे (वय 42, रा अंबुलगा, ता. मुखेड, नांदेड) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
नांदेड जिल्ह्यात (31 मे) सायंकाळी झालेल्या जोरदार वारा आणि गारांच्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर नांदेड शहरातील रस्त्यावरील झाडे वाहनांवर पडून वाहनांचे नुकसान होऊन रहदारीस अडथळा निर्माण झाला. जिल्हयात वीजेचा कडकडाट सुरु होता. यावेळी अंबुलगा (बु) येथील चंद्रकलाबाई झाडे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान जोरदार मान्सून पूर्व पावसाच्या सरीने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
टॅग्स:





