NANDED NEWS: शेतात सोयाबीन उभी, पण शेंगांमध्ये दाणाच नाही ; पावसाअभावी शेतकरी हवालदिल
NANDED NEWS: नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात पावसाने दीड ते दोन महिन्यांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.

NANDED NEWS: नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात पावसाने दीड ते दोन महिन्यांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
पावसाअभावी सोयाबीन आणि कापसाची पिकं शेतातच करपली असून, सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणेही भरलेले नाहीत. त्यामुळे उत्पादन हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, प्रशासकीय पाहणी आणि बैठका होत असल्या तरी प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. “अधिकाऱ्यांनी संपूर्ण शेतात फिरून एक किलो सोयाबीन काढून दाखवावं; बदल्यात क्विंटलभर काजू-बदाम देऊ,” असा संतप्त टोला शेतकऱ्यांनी लगावला.
दाभड येथील शेतकरी आत्माराम टेकाळे यांनी वाळलेल्या सोयाबीन पिकाची व्यथा मांडत शासनाकडून थेट मदतीची मागणी केली आहे.






