‘नाना…तू देवदूता सारखा नागरिकांसाठी धावत आहे’

शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रतिपादन
हडपसर – प्रभाग क्र. 26 मध्ये घनकचऱ्यासाठी घंटा गाडीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, नगरसेवक नाना भानगिरे यांनी चौका-चौकात उभारलेल्या सॅनिटायझर फवारणी रूमची पाहणी करून नाना तू देवदूता सारखा नागरिकांसाठी धावत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार शिवजीराव आढळराव पाटील यांनी काढले.
पोलीस, डॉक्टर, नर्सेस, फायर ब्रिगेडचे जवान, स्वच्छता कर्मचारी यांना हडपसर येथील नगरसेवक भानगिरे यांच्या माध्यमातून व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आढळराव बोलत होते.
यावेळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मंगेश वाघ, पालिकेचे कर्मचारी अधिकारी, फायर ब्रिगेडचे अधिकारी पोलीस कर्मचारी, ऑफिसर सुहास यादव, नगरसेविका प्राची आल्हाट, अभिमन्यू भानगिरे, गणेश वाडकर, योगेंद्र गायकवाड, योगेश सातव, विकास शेवाळे, तुषार पवार, नाना भानगिरे आदी उपस्थित होते.





