नाना पटोलेंकडून योगींची रावणाशी तुलना ; तर भाजप म्हणाले,”त्यांनी चीनच्या सीमेवर जावं अन्…”

Nana Patole on Yogi । लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान येत्या २५ मे रोजी पार पडणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत प्रत्येक राजकीय नेते एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहेत. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी,”सीता मातेला पळवून नेण्यासाठी रावण भगवे कपडे घालून आला होता, आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येतात.” असे धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.
त्यांनी चीनच्या सीमेवर जावं आणि बघून यावं Nana Patole on Yogi ।
एका वृत्तसंस्थेशी बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी, “चीनने भारताची कोणतीही जमीन बळकावलेली नाही. भारताच्या कोणत्यांनी भागावर चीनने अतिक्रमण केलेलं नाही. जर नाना पटोले यांना असं वाटत असेल तर मी त्यांना चीनच्या सीमेवर घेऊन जायला तयार आहे. त्यांनी चीनच्या सीमेवर जावं आणि बघून यावं”, असे आव्हान दिले आहे.
#WATCH | West Bengal: On Maharashtra Congress chief Nana Patole’s remark on UP CM Yogi Adityanath and China, Assam CM Himanta Biswa Sarma says, “China is not capturing any territory. If Nana Patole wants, we can send him to Chinese boundary. He can go there, see and come back.”… pic.twitter.com/Gd9xXIAsmg
— ANI (@ANI) May 22, 2024
काँग्रेसच्या नेत्यांना नैराश्य Nana Patole on Yogi ।
काँग्रेससह इंडिया आघाडीला भगव्या रंगाचा द्वेष आहे. त्यांना सनातन धर्माचा द्वेष आहे. याच काँग्रेसनेच भगवा आंतकवाद असा शब्द पुढे आणला होता. खरं तर पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर जनतेने आपल्याला नाकारलं, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना नैराश्य आलं आहे. त्यातूनच अशा प्रकारची विधानं केली जात आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते मनिष शुक्ला यांनी दिले.
दरम्यान, नाना पटोले यांनी काल योगी आदित्यनाथ यांची तुलना रावणाशी केली होती. “रावण सीता मातेला पळवून नेण्यासाठी भगवे कपडे घालून आला होता. आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येत आहेत.” असं ते म्हणाले होते. पटोले यांनी आदित्यनाथ यांच्या राजकीय वक्तव्यांवर आक्षेप घेतला होता. तसेच “योगी आणि भाजपा नेते केवळ काँग्रेसवर टीका करत आहेत. मात्र देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर, चीनचं सीमेवरील अतिक्रमण, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर अवाक्षर काढत नाहीत.”, अशी टीकाही त्यांनी केली होती.





