“नाना पाटेकरांचा आत्मा जळतोय म्हणूनच…”; कोर्टाच्या निकालानंतर तनुश्री दत्ताची पोस्ट

Tanushree Dutta Post | अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने एका फिल्मच्या शुटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी तिने नाना पाटकरांसह इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी कोर्टात विनयभंग आणि धमकीची तक्रार दाखल केली होती आणि याचिकाही दाखल केली. मात्र नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणी दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर आली. हे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याने दंडाधिकारी कार्यालयाने बी समरी रिपोर्ट फेटाळून लावला आहे.
कोर्टाच्या निकालानंतर आता तनुश्रीने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. तसेच याचिका कोर्टाने रद्द केली नसल्याचा दावा केला आहे. तनुश्रीने म्हटलं आहे “कृपया कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, फसव्या आणि बदनामीकारक बी सारांश अहवाल न्यायालयाने फेटाळला आहे. माझ्या लैंगिक छळाचे प्रकरण नाही. 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी दाखल केलेला बी सारांश अहवाल न्यायालयीन युक्तिवाद आणि खटल्यांच्या अनेक महिन्यांनंतर काल न्यायालयाने नाकारला. म्हणजे मुळात नाना पाटेकर यांच्यावरील लैंगिक छळाचे प्रकरण अद्याप सुरु आहे. Tanushree Dutta Post |
दरवर्षी नानांची पीआर टीम केस बंद झाल्याबद्दल अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवते आणि हा देखील तोच प्रकार करण्यात आला आहे. ते कोर्टात हे प्रकरण हरले म्हणून चुकीची माहिती पसरवण्याचा आणि मीडियाला गॅसलाइट करण्याचा प्रयत्न करत आहेत. कृपया पॅथॉलॉजिकल लबाड आणि त्याच्या पीआर टीमवर विश्वास ठेवू नका,” अशी विनंती तनुश्रीने केली आहे. Tanushree Dutta Post |
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली की, “नाना पाटेकर यांच्यावर लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असून त्यांना याची माहिती आहे. मीडिया आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी नाना पाटेकरांच्या पीआरने पेरलेल्या या खोट्या बातम्या आहेत. मूळ केस अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेली नाही, मग कोणताही न्यायाधीश कसा निकाल देऊ शकतो. सध्याच्या न्यायालयीन सुनावणी फक्त 2019 मध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या बी समरी अहवालावर होती आणि निकाल त्या संदर्भात आहे.
बी सारांश हा खटला बंद करण्याचा एक कमकुवत प्रयत्न होता पण माझ्या कायदेशीर टीमने त्या गोष्टीला बरोबर हाताळलं आहे आणि हा युक्तिवाद जिंकला आहे. हा आमचा एक छोटासा विजय होता पण या निकालाने नानांचा आत्मा जळत आहे म्हणूनच अशा प्रकारे चुकीची माहिती पसरवली जात आहे. मिडीयाच्या खोट्या बातम्या तयार करण्यासाठी भरपूर पैसा लावला जात आहे. त्यांच्यावरील खटला बंद झालेला नाही. कृपया तथ्य तपासा” असं म्हणत तनुश्रीने कोर्टाची तथ्ये तपासून घेण्याची विनंती केली आहे. याद्वारे तिने नाना पाटेकरांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय होतं?
अभिनेत्री तनुश्री दत्तानं 2008 मध्ये नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधात एका डान्स सिक्वेन्स दरम्यान लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात तनुश्रीने एफआयआर दाखल केली होती.
हेही वाचा :
Pune : पुण्यात चाललयं तरी काय ? तरुणाचे भरचौकात अश्लील चाळे; महिलादिनी घृणास्पद प्रकाराने खळबळ





