Pune : पुण्यात चाललयं तरी काय ? तरुणाचे भरचौकात अश्लील चाळे; महिलादिनी घृणास्पद प्रकाराने खळबळ

पुणेः सध्या पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच चाललेला आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चाललेला आहे. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुण्यात टॅक्सीने प्रवास करणाऱ्या महिलेला अशाच प्रकाराचा अनुभव आला. मात्र, महिलेने थेट पोलिस ठाणे गाठल्याने पुढे घडणारा मोठा अनर्थ टळला आहे.
आज सकाळी महिला दिनी पुण्यात एक अत्यंत घृणास्पद प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे पुण्यात पोलिसांचा धाक राहिलाय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका महागड्या गाडीत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने महिलांना अश्लिल चाळे केले आहेत. तसेच या तरुणाने चौकात सिंग्लनला गाडी थांबवत लघू शंका देखील केली आहे. या अत्यंत घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यात नेमकं चाललयं तरी काय ?
या घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, BMW या महागड्या कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाचे म्हणजे आज जागतिक महिला दिन असून अशा प्रकाराची घटना घडल्याने पुन्हा पुण्यात नेमकं चाललयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पुण्यात दारू पिऊन, हातात बियरच्या बॉटल घेत, भर रस्त्यात गाडी लावून, रोड वर लघवी करताना करोडपती वडिलांचे 'सु' पुत्र… pic.twitter.com/KfcRdjRqam
— Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) March 8, 2025
येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकाता ही घटना घडली आहे. महिलांच्या समोर संबंधिताने अश्लील चाळे केले. BMW या महागड्या गाडीत मद्यधुंद अवस्थेत हा तरुण होता. त्यासोबत गाडीत त्याचे इतर दोन मित्र्यांनीही मद्याचे प्राशन केले होते. महिलांना अश्लील चाळे करून ही गाडी आणि त्यातील तरुण वेगाने वाघोलीच्या दिशेने निघून गेले, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या BMW महागड्या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे.
सोशल मीडियावर संताप
या घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक उरला आहे का असा प्रश्न या प्रकारामुळे विचारण्यात येत आहे.




