नाना पाटेकरांच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Nana Patekar | अभिनेता नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. नाना पाटेकर यांच्या आगामी वनवास चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते व्यस्त आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात नाना पाटेकर यांच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वनवासच्या प्रमोशनच्या निमित्ताने नाना पाटेकर चित्रपटाच्या टीमसोबत मजा-मस्ती करताना दिसले. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरह व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नाना त्यांच्या आगामी वनवास चित्रपटाच्या टीमसोबत प्रमोशन करताना दिसतात. यामध्ये नाना पाटेकर अभिनेता उत्कर्ष शर्मा आणि अभिनेत्री सिम्रत कौर या नवोदित कलाकारांसोबत दिसत आहेत. यावेळी नाना टीमसोबत फोटोशूट करताना पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
टीमसोबत फोटोशूट झाल्यानंतर नाना पाटेकर यांनी नवख्या कलाकारांसाठी जे केलं ते पाहून सगळेच चकित झाले. टीमसोबत फोटोशूट झाल्यानंतर नाना मीडियाला एक काम करत या दोन मुलांचा फोटो घ्या, असं सांगत स्वत: फ्रेममधून बाजूला होतात आणि त्या दोघांना एकत्र मीडियासमोर फोटो काढण्यासाठी उभं करतात. नवोदित कलाकारांसाठी नानांनी केलेल्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
‘वनवास’च्या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला. एका बापाची मन हेलावणारी कहाणी टीझरमध्ये बघायला मिळते. ‘गदर’ आणि ‘गदर २’ या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक अनिल शर्मांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. 20 डिसेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा:
Ranji Trophy 2024-25 : महाराष्ट्राचा मेघालयवर दणदणीत विजय, हर्षल काटे ठरला सामन्याचा मानकरी….





