नाना पाटेकरांनी चाहत्याला लगावली चापट? ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य आले समोर

Nana patekar : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात नाना पाटेकर यांनी रागाच्या भरात एका चाहत्याला चापट मारली आहे. नाना पाटेकरांनी चाहत्यासोबत केलेल्या गैरवर्तणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी नाना पाटेकर यांना ट्रोल केले आहे.
व्हायरल व्हिडिओत तो चाहता नानांसोबत फोटो काढण्यासाठी पुढे येतो तेवढ्यात नाना त्याच्या डोक्यात मारुन त्याला तिथून पळवून लावल्याचे दिसते. चित्रपटाच्या क्रू मेंबरने या मुलाच्या गळ्याला पकडून त्याला तेथून दूर नेले. यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ त्यांच्या चित्रपटातील सीन दावा दिग्दर्शकाअनिल शर्मा यांनी केला आहे.
Nana Patekar, during the shoot of a film in Varanasi, was caught on camera slapping a fan who attempted to take a selfie. The video went viral on social media, showing the actor gesturing the fan away after the incident. Patekar is currently filming for the movie “Journey.” pic.twitter.com/dckJ01EHME
— Tauseef Sheikh (@tauseefjourno) November 15, 2023
अनिल शर्मा म्हणाले की, नानांनी कोणाला मारलं नाही, तर तो माझ्या चित्रपटाचा सीन आहे. बनारसच्या मधोमध रस्त्यावर आम्ही त्याचे चित्रीकरण करत होतो. तेथे जमलेल्या इतर चाहत्यांनी ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले आणि त्यानंतर चित्रपटाचा सीन लीक केला. आता सोशल मीडियावर नानांना नकारात्मक आणि असभ्य अभिनेता म्हणून ट्रोल केले जात आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे.
पुढे ते म्हणाले, “मी विनंती करतो की चाहत्यांनी या व्हिडिओचे सत्य समजून घ्या. हा चित्रपटाचा सीन असून नानांनी कोणाला मारहाण केलेली नाही.” दरम्यान, नाना पाटेकरांचा व्हिडिओ वाराणसीतील दशाश्वमेध घाटातील आहे. येथे ‘जर्नी’ चित्रपटाचे शूटिंग नाना पाटेकर करत आहे.





