मुंबईतील ‘या’ 7 रेल्वेस्थानकांची नावं बदलणार

मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आला आहे. नावे बदलण्याच्या परवानगीसाठी आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मांडला होता.
नावे बदलण्याच्या या प्रस्तावामध्ये करी रोड, सँडहर्स्ट, मरीन लाइन्स, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड, किंग्ज सर्कल या स्थानकांचा समावेश होता.ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत याआधी निर्णय घेण्यात आला होता.
कोणत्या रेल्वे स्थानकाला कोणते नाव देणार जाणून घेऊया…
करी रोड – लालबाग
सँडहर्स्ट रोड – डोंगरी
मरीन लाईन – मुंबादेवी
चर्नी रोड – गिरगाव
कॉटन ग्रीन- काळाचौकी
डॅाकयार्ड – माझगाव रेल्वे स्थानक
किंग सर्कल- तिर्थंकर पार्श्वनाथ





