Pune Gramin : इंदापूर शहरात हरिनामाच्या गजरात नगर प्रदक्षिणा दिंडी

इंदापूर : श्रीगुरु नामदेव अण्णा वसेकर पुण्यतिथी उत्सव समिती यांच्या वतीने श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड २२५ वर्ष स्थापना पूर्ती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व माऊली गाथा पारायण सोहळ्याच्या निमित्त इंदापूर शहरात नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा शुक्रवार (ता. 12 सप्टेंबर) रोजी पार पडला. इंदापूर शहरातील सर्वधर्मीय बांधवांनी दिंडी सोहळ्याचे उस्फुर्त स्वागत केले.
तर मुख्य बाजारपेठेत शहा परिवाराच्या वतीने इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा, शहा ग्लोबल स्कूल संस्थेचे विश्वस्त मुकुंद शहा, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा, नारायणदास रामदास ट्रस्टच्या वैशाली शहा, तसेच शहा ग्लोबल स्कूलचे अंगद शहा, रुचिरा शहा, यांनी वारकऱ्यांचे मानाच्या विणेकरी यांचे पूजन करून, सांप्रदायाच्या प्रथेप्रमाणे फुगड्या झिम्मा खेळून आनंद व्यक्त करून, ज्ञानोबा तुकाराम च्या गजरात दिंडी सोहळ्याचे विधिवत स्वागत केले.
या सप्ताहाची सुरुवात विना पूजन, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन भरत शहा व त्यांच्या सुविद्य पत्नी वैशालीताई शहा यांच्या हस्ते करण्यात आले होते. या अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ काकडा तब्बल सात दिवस हरी नामाचा गजर करत झाला असून, यामध्ये ह भ प सागर महाराज बोराटे नातेपुते, ह भ प देवेंद्र महाराज निडाळकर गाथा मूर्ती, श्री गुरु जयवंत महाराज बोधले पंढरपूर, चिन्मय महाराज सातारकर मुंबई, अमृत महाराज जोशी बीड, श्री गुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर, यांची कीर्तने पार पडली.
तर काल्याचे किर्तन शनिवार (ता. 13) सकाळी 10 ते 12 या वेळेत श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर यांचे होणार असून महाप्रसाद वै.ह.भ.प.गोकुळदास शहा यांच्या स्मरणार्थ शहा परिवाराच्या वतीने वाटप करण्यात येणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे संयोजक श्री गुरु नामदेव अण्णा माळी वशेकर पुण्यतिथी उत्सव समितीचे अध्यक्ष ह भ प भरत शहा यांनी केले. या अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या कीर्तनासाठी तालुक्यातील भाविक भक्तांनी हरी नामाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.





