Dharashiv News : धाराशिव हादरलं ! नळदुर्ग किल्ल्यावरून आईने मुलांसह उचलले टोकाचे पाऊल; माय-लेकाचा करुण अंत
जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यावरून एका आईने आपल्या तीन चिमुकल्या मुलांसह (Dharashiv News) उडी मारली असून, या दुर्देवी घटनेत आई आणि एका मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Dharashiv News : जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यावरून एका आईने आपल्या तीन चिमुकल्या मुलांसह (Dharashiv News) उडी मारली असून, या दुर्देवी घटनेत आई आणि एका मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या करणारी महिला ही धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील वंताळा गावची रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्या माऊलीने पोटच्या तीन लहान लेकरांसह किल्ल्यासारख्या उंचावरून उडी (Dharashiv News) मारून इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरगुती वाद किंवा अन्य काही कारण आहे का, याचा सखोल तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.
माय-लेकाच्या अशा दुर्दैवी अंतामुळे शोककळा पसरली असून दोन गंभीर जखमी चिमुकल्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी (Dharashiv News) स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने मदतकार्य राबवून जखमी चिमुकल्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलींवर पुढील तातडीच्या उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.






