नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एकाला अटक ; जमावाला भडकावल्याचा आरोप

Nagpur Violence । नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी दोन गटात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांना आणखी मोठे यश मिळाले आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका आरोपींला पोलिसांनी अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
फैजान खातीबवर जमावाला भडकावल्याचा आरोप Nagpur Violence ।
नागपूर हिंसाचार प्रकरणात फैजान खातीब याला हिंसाचाराच्या सुमारे दहा दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रानुसार फैजान खातीब हा जहाल विचारांचा असून त्याने जमावाला भडकावले असल्याची माहिती पुढे आली आहे. फैजान खातीब सह आणखी एक आरोपी शहबाझ काझी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अद्याप नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र अजूनही सुरूच असल्याचे बघायला मिळाले आहे. फैजान खातीब हा अकोल्यामध्ये असतो. मात्र ईद निमित्त महिनाभरापूर्वी तो त्याच्या मूळगावी म्हणजेच नागपुरात आला होता. 17 मार्चला नागपूरला झालेल्या हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ फुटेच्या माध्यमातून खातीबला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरूच Nagpur Violence ।
नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहिम खान आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअर नंतर फैजान खातीब ही या प्रकरणातील तिसरी मोठी अटक मानलीजात आहे. यापूर्वी नागपूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील फूटप्रिंटसच्या आधारे नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या 113 वर पोहोचली होती. आता त्यात आणखी आरोपींची भर पडली आहे.
हेही वाचा
विधिमंडळ समितीमध्ये छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंना स्थान नाही; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण





