Nagpur SBL Company Blast : नागपुरात स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 15 जणांचा मृत्यू
Nagpur SBL Company Blast : घटनेच्या वेळी विविध युनिटमध्ये 30 हून अधिक कामगार कार्यरत होते. स्फोटानंतर काही कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Nagpur SBL Company Blast : नागपूरमधील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत सकाळी 7 वाजता हा स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात 15 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात काही कामगार जखमी झाले आहेत.
घटनेच्या वेळी विविध युनिटमध्ये 30 हून अधिक कामगार कार्यरत होते. स्फोटानंतर काही कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे आणि बचावकार्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. Nagpur SBL Company Blast
मोठ्या प्रमाणात झालेल्या स्फोटनंतर परिसरात आगही लागली आहे. दुसरीकडे परिसरात मृतकांच्या नातेवाईकांनी परिसरात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या स्फोटाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मात्र या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांकडून कंपनीच्या सुरक्षितता उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. Nagpur SBL Company Blast :
हेही वाचा:






