MLC Election Result : नागपूरमध्ये हायहोल्टेज ड्रामा! भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर; कोण मारणार बाजी
MLC Election Result : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

MLC Election Result : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, अभिजीत वंजारी यांनी ९२७ मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे नागपूरच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (MLC Election Result)
उपलब्ध मतांच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना २८,९९८ मते, तर भाजपचे सुधाकर कोहळे यांना २८,०७१ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना १४,७०८ मते मिळाल्याची माहिती आहे. अनिल सोले यांना ९९ मते मिळाली आहेत. (MLC Election Result)
या मतमोजणीत एकूण ८४,००३ मतांची नोंद असून, त्यापैकी ७६,८७५ मते वैध ठरली आहेत. तर ७,१२८ मते रद्द झाली आहेत. अभिजीत वंजारी आणि सुधाकर कोहळे यांच्यातील मतांचा फरक लक्षवेधी ठरत आहे. (MLC Election Result)
MLC Election : विधान परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर; पाच मतदारसंघांत कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?

