Nagar : बचतगटांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने महिला सक्षम – आ. खताळ

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील १६३ महिला बचतगटांना उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अंतर्गत ८ कोटी २१ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. या माध्यमातून गावागावातील महिलांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक पाठबळ मिळाले असल्यामुळे महिला खऱ्या अर्थाने सक्षम झाल्या असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर पंचायत समिती येथे समुदाय संसाधन व्यक्तींची आढावा बैठक आणि खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूकआणि निधीचे वाटप करण्यात आले होते. यावेळी आ खताळ म्हणाले, की पूर्वी बँकांकडून बचतगटांना अपेक्षित सहकार्य मिळत नव्हते. मात्र, आता तालुक्यातील बचतगट थकबाकीमुक्त झाले असल्यामुळे २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण मिळत आहे. यासाठी सर्व बँक अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. जनसेवा कार्यालयातर्फे मोफत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. महिलांनी या संधींचा लाभ घ्यावा. तालुक्यात महिला बचतगटांसाठी मोठ्या उद्योगांचे मार्ग मोकळे करण्यात येत असून, रोजगारनिर्मितीला गती मिळणार असल्याचे आ.खताळ यांनी सांगितले
संगमनेर तालुक्यातील सर्व बचतगटांना शासकीय निधी, कर्ज व व्यवसायासाठी आवश्यक मदत देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. महिलांनी पुढाकार घ्यावा. अडचणी आल्याच तर मी आणि आमदार अमोल खताळ तुमच्यासोबत आहोत.
– नीलम खताळ, सामाजिक कार्यकर्त्याउमेद अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप सुरू आहे. महिलांनी वेळेवर परतफेड केल्याने बँकांचा विश्वास मिळवला आहे. त्यामुळे आता सर्व बँका कर्ज वाटपात पुढाकार घेत आहेत.
– राजेंद्र ठाकूर, प्रभारी गटविकास अधिकारी





